Gambling : भोरचा बंगला; पुण्यातील जुगारींचा नवा पत्ता, रात्रीत होते लाखोंची उलाढाल
पुणे, निर्भीड वर्तमान:- सातारा जिल्ह्यातील पत्यांचा कल्ब सुरू असलेली बातमी निर्भीड वर्तमान याआपल्या वृत्तसेवेने प्रसारीत केल्यानंतर तात्काळ बंद करण्यात आला खरं, पण लागलीच पुण्यातील जुगारींचा जत्रा आत्ता नविन ठिकाणी म्हणजेच भोर येथील नामचीन जुगारासाठी पंचक्रोशीत बंगल्यात सुरू आहे.
पुणे शहरातील दबंग पुणे शहर पोलिस आयुक्त साहेब अवैध्य धंद्यांना पुणे शहरात थारा देत नाहीत तर सोबतच पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांनीही अवैध्य धंदे हद्दपार करण्याचा निर्धार घेतला व जुगार चालकांना तंबीच दिली मग काय सर्व जुगारी मंडळी पुणे शहर, जिल्हा सोडुन तडीपार झाल्याचे चित्र झाले खरे, पण सातारा हद्दीतील कल्ब बंद झाल्याची बातमी कळताच या संधीचा आपला आर्थिक फायद्यासाठी पुणे पोलीस अधीक्षक यांच्या अवैध्य धंदे हद्दपाराच्या निर्धाराला धाब्यावर बसवत बंगल्याच्या मालकाने बंगल्यातच पत्यांचे डाव रंगविले आहेत.
असे मुळीच नाही की हा क्लब नव्याने सुरू झाला आहे तर वर्षोनी वर्ष हा कल्ब सुरूच आहे परंतू पुर्वी हा वेळेनुसार सुरू असायचा नाव न सांगण्याच्या अटींवर एका खेळीने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक प्रशासन व इतरत्र चर्चेत 5/10 चा एखादा चोरून टेबल लावतो अशी चर्चा आहे. परंतू 20/40 पासुन 100/200 चे मोठेलाट टेबल या बंगल्यात सुरू असतात लाखोंची उलाढाल रात्रीत होते यासाठी खेळींना पुण्याहून येण्यासाठी गाडीचे भाडे दिले जाते तर खासखेळींना फॅक्शन वेगळी दिली जाते बंगला खाजगी असल्याने बाहेरील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आत जावू शकत नाहीत मग काय नो टेन्शन बिन्धास्त खेळ रात्रंदिवस सुरू असतो.
गोरगरीब जुगारच्या नादात कर्जबाजारी झालेल्या नागरिकांची लुट करणारे, पुणे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाला धाब्यावर बसविणाऱ्या या बंगला मालका विरोधात स्थानिक पोलीस कारवाई करतात का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
बंगल्याचे लोकेशन, व्हिडिओ, कारवाई पुढिल भागात… अश्याच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी वाचत रहा निर्भीड वर्तमान