Illegal Constaction : अनाधिकृत बांधकाम निष्कासित करून पिडीत कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण
2 सप्टेंबर पासुन महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान करनार आमरण उपोषण
पुणे : धाकदडपशाही करून मुळ उतारा नावावर असतांनाही वडीलोपार्जीत महार वतन जमिन बळकावुन त्यावर अनाधिकृत बांधकाम करून हक्कापासुन वंचित ठेवलेल्या पिडीत शिंदे कुटुंबाला न्याय मिळवून जमीन मूळ मालकास परत करण्यात यावी या मागणी करिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ए] पक्षाच्या प्रणीत महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान अध्यक्ष शशिकांत दारोळे हे दिनांक ०२/०९/२०२४ रोजी पासुन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करणार आहे.
सविस्तर;
या प्रकरणातील पिडीत शिंदे कुटुंब हे भोसरी येथील राहणार असुन मौजे भोसरी येथे महार वतन जमिन आहे. शिंदे जातीने महार असुन त्यांचे नाव वारस हक्काने सारबारा उता-यास लागलेले आहे. या जागेवर पुर्वी शिंदे हे कुटुंबासह राहत होते. परंतु राठोड नावाच्या व्यक्तिने घर तोडुन घरापासुन या कुटुंबास बेघर केले, आणी जमिन हस्तगत करण्यासाठी स्थानिक राजकीय पुढारी व त्यांचे नातलग आगरवाल बंधु, राठोड हे त्यांच्या बंधु हे सातत्याने प्रयत्न करत आहेत.
पिडीत शिंदे हे गरिब कुटुंबातील असुन मजुरी करून कुटुंबाचा उदर्निवाह चालवित आहेत. सदर जागा हस्तगत करून जागेतुन परागंदा करण्याचा स्थानिक राजकीय पुढारी व त्यांचे नातलगांचा कुटील हेतु आहे. त्यामुळे त्यांनी जागेचे बोगस खरेदीखत करून घेतले होते या प्रकारची तक्रार सादर केल्यानंतर साल २०१५ मध्ये फेरफार नोंद रद्द झालेली आहे, परंतु जागा धाकदडपशाही जबरदस्ती करून ताब्यात घेऊन जागेवर अनाधिकृत ताबा घेण्यासाठी वरिल राठोड व इतर साथीदार आले असता शिंदे यांनी एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज सादर केला होता परंतु कोणतीही कारवाई केल्या गेली नाही, याच विषयास अनुसरून जिल्हाधिकारी यांना तक्रार अर्ज सादर केलेला आहे तेथूनही कोणतीही कारवाई झाली नाही, अनाधिकृत बांधकाम केल्या गेले, या अनाधिकृत बांधकामा बाबत तक्रार सादर केल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे आदेशाची नोटीस बजावली असून आजपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. आज रोजी जागेवर अनधिकृत बांधकाम पूर्ण झाले आहे. पिडीत शिंदे परिवार यांनी आपल्याच जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत त्यास अडवणुक केली असता कुटुंबातील लोकांना जातीवाचक शिवीगाळ करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबाचे जगणे मुश्किल झालेले आहे.
शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देवुन जागेवरून हाकलुन देवुन हक्कापासुन वंचित केले गेले व आज रोजी सातबारा उतारा हा मूळ मालक यांच्या नावे आहे परंतु कायद्याची पायमल्ली करत दादागिरी करून जमीन बळकविली गेली आहे यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. पिडीत शिंदे न्याय मागण्याकरिता भोसरी MIDC पोलीस स्टेशन येथे गेले असता तेथील साहेब यांनीही अर्वाच्य भाषा वापरून जातिवाचक शिवीगाळ करून हाकलून दिले. यासर्व प्रकारामुळे शिंदे कुटुंब भयभित जीवन जगत आहे.
यासर्व विषयाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कुटुंबावर झालेल्या अन्यायाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे व कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया [ए] प्रणीत महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने दिनांक ०२/०९/२०२४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आमरण उपोषणसाठी बसणार आहेत.