ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

Illegal Constaction : रात्रभर मोहीम राबवत 41 अनधिकृत हॉटेल, बार, पबवर धडक कारवाई

मुंबई, निर्भीड वर्तमान:- नवी मुंबईतील अनाधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल/बार ॲन्ड रेस्टॉरंट/ लेडीज बार/ पब / लॉज/ हुक्का पार्लरवर नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने महानगरपालिका क्षेत्रात 30 जून रोजी रात्रीपासून 1 जुलैच्या पहाटेपर्यंत धडक कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे तसेच मार्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे अशा 41 हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लरवर तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त्‍ श्री.सुनिल पवार यांनीही उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्यासह कारवाईच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली आहे.

यामध्ये बेलापूर विभाग क्षेत्रातील लेडीज बार (1). VIP (2). धुम नाईट (3). नाईट अँगल (4). कबाना (5). बेबो (6). स्टार नाईट,. बेलापुर विभाग क्षेत्रातील हॉटेल (7). लक्ष्मी हॉटेल, (8) महेश हॉटेल (9). अश्विथ हॉटेल (10). स्पाइस ऑफ शेड (11). घाटी अड्डा (12). ब्रु हाऊस कॅफे (13). रुड लॉन्च (14). निमंत्रण हॉटेल (15). बहाणा (16). कॅफे नाईटिन (17). बार मिनिस्ट्री (18). बार स्टॉक एक्सचेंज (19). नॉर्दन स्पाइसेस (20). कॉफी बाय डी बेला (21). दि लव्ह अँड लाटे (22). सुवर्ड्स कॅफे (23). मालवण तडका,

नेरुळ विभाग क्षेत्रातील (1).साई दरबार सेक्टर 02 नेरुळ (2).भारती बार, सेक्टर 1 शिरवणे (3).गंगा सागर लॉज सी एन जी पंपाजवळ सेक्टर 13 (4).सिल्व्हर पॅलेस सेक्टर 13 (5). शानदार हुक्का पार्लर सेक्टर-1 शिरवने (6). सत्यम लॉज सेक्टर 1 शिरवणे,

वाशी विभाग क्षेत्रातील (1).हॉटेल गोल्डन सुट्स, वाशी प्लाझा, से.17 (2).टेरेझा, वाशी प्लाझा से-17 (3).अंबर रेस्टोरंट आणि बार,वाशी प्लाझा, से-17

कोपरखैरणे क्षेत्रातील आदर्श बार, सेक्टर 1A, कोपरखैरणे, नवी मुंबई.

घणसोली क्षेत्रातील (1).एम. एच-43 रेस्टॉरंट अॅन्ड बार, से.09, घणसोली, (2). मोनार्क रेस्टॉरंट व बार, ठाणे-बेलापुर रोड, रबाळे एम.आय.डी.सी., यांचे अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले विदयुत होडींग, साई इन लॉजचे छोटया आकाराचे विदयुत होर्डीग, (3).सीएनजी पंप यांचे छोटया आकाराचे अनधिकृत होर्डीग, (4). मल्लिका बार व रेस्टॉरंट यांनी उभारलेले पत्र्याचे शेड व विदयुत होर्डीग तसेच (5). मिड लँड हॉटेल रेस्टॉरंट व बार, से.03 यांनी पाठीमागील बाजुस उभारलेले बांबुचे पक्के शेड,

ऐरोली क्षेत्रातील (1).सेक्टर- 1 ऐरोली येथील अनधिकृत व्यवसाय करत असलेले बांबूचे/ताडपत्रीचे शेड. (2). ऐरोली नाका येथील चायनिज स्टॉल. (3). से-19 येथील कृष्णा रेस्टोरंट यानी उभारलेले बांबुचे शेड या वर कारवाई करण्यात आली.

अशाप्रकारे एकुण बेलापुर कार्यक्षेत्रातील 23, नेरुळ कार्यक्षेत्रातील 6, वाशी कार्यक्षेत्रातील 3, कोपरखैरणे कार्यक्षेत्रातील 1, घणसोली कार्यक्षेत्रातील 5, व ऐरोली कार्यक्षेत्रातील 3 अनाधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल/बार & रेस्टोरंट/ लेडीज बार/ पब / लॉज/ हुक्का पार्लर वर कारवाई करण्यात आली

सदरची कारवाई आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार श्री.सुनिल पवार अतिरिक्त आयुक्त (1) व डॉ.राहुल गेठे उप आयुक्त (अतिक्रमण), व यांच्या निर्देशनाखाली करण्यात आली. सदर मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त श्री. शशिकांत तांडेल, डॉ.अमोल पालवे,श्री.सागर मोरे,श्री. सुनिल काठोळे,श्री.संजय तायडे, श्री.अशोक अहिरे व त्यांचे अधिनस्त अतिक्रमण विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

ज्या हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लर यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे तसेच मार्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे अशा व्यावसायिक आस्थापनांवर सुरु केलेला कारवाईचा बडगा यापुढील काळातही असाच सुरु राहणार आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!