Illegal Construction: अनाधिकृत बांधकाम प्रकरणी प्रसिद्ध विकासका विरोधात गुन्हा दाखल
ठाणे, निर्भीड वर्तमान :- अनाधिकृत गाळे बांधून व त्यांची विक्री केल्याप्रकरणी ठाण्यातील प्रसिद्ध विकासक “विजय रिॲलिटी” चे मालकांवर ठाणे महानगरपालिका माजिवडा मानपाडा प्रभाग समिती तर्फे महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२,५३,५४,५५ अंतर्गत कासरवडवली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजसेवक योगेश मुंधरा हे यांनी दिलेल्या तक्रारीवरून व प्रकरणाचा सातत्यपूर्ण पाठपुरावाकरुन सदरचा गुन्हा शेवटी नोंद करण्यात आला आहे.
विजय पार्क, घोडबंदर रोड इथे बांधण्यात आलेले हे अनधिकृत वाणिज्य गाळे यांना सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांनी नोटीस बजावली होती परंतु या बेकायदेशीर बांधकामाची एक वीटही पाडण्यात आली नाही आणि आता ते पूर्णपणे बांधले गेले आहे आणि व्यापलेले आहे. नोटीस बजावून अनधिकृत गाळे बांधकाम करणाऱ्यांकडून लाखोंची वसुली झाली आहे का? असा प्रश्न नागरिकांसमोर पडला होता तर माजिवडा मानपाडा प्रभाग कार्यालय कार्यक्षेत्रात अशा प्रकारे बेकायदा बांधकामांना संरक्षण दिले जाते अश्या चर्चा सध्या सुरू आहेत. कारण अशी 15 हून अधिक उदाहरणे आहेत जिथे बांधकामादरम्यान नोटिसा बजावण्यात आल्या, परंतु प्रभाग कार्यालयाने कधीही बेकायदा बांधकाम पाडले नाही.
सहाय्यक आयुक्त यांनी ठाणेकरांना सांगावा की, अनधिकृत बांधकामांवर फक्त नोटीस काढल्या कारवाई का केली नाही? तुम्हाला शासकीय पगार पुरत नाही का ? हे धंदे कधी बंद होणार ? असा खडा सवाल ठाणेकर नागरिक म्हणून व समाजसेवक योगेश मुंधरा यांनी केला आहे.