ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

Mahar Watan; महारवतन जमिनी परत मिळविण्यासाठी पक्ष संघटना बाजूला ठेवून आंबेडकरी समाजाने एक व्हावे – शशिकांत दारोळे

मुंबई, निर्भीड वर्तमान :- महारवतन Mahar Watan; जमिनी परत मिळविण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे गेले १० दिवसांपासून उपोषनावर बसलेले भिमसैनीक शशिकांत दारोळे यांनी आपल्या समाज बांधव यांना पत्रद्वारे आव्हान केले आहे.

काय म्हटले आहे पत्रांमध्ये;

मी शशिकांत दारोळे आपल्या सर्वांन मधलाच एक भिमसैनीक आंबेडकरी अनुयायी आहे गेल्या अनेक वर्षे पासून मी निस्वार्थी पणे समाजासाठी काम करत आहे. माझ्या आपल्या सर्व समाज बांधवांन कडून काही अपेक्षा आहे त्या आपणास या पत्राद्वारे आपल्या पर्यंत पाठवत आहे.

सर्व प्रथम मला कोणत्याही पक्षामध्ये बांधु नये मी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी आहे व कायम स्वरूपी मी-चळवळीशी एकनीष्ठ पणे काम करणारा सर्व सामान्य कार्यकरता म्हणून आहे. या अगोदर मी पक्षामध्ये कार्यरत होतो परंतु जे अनुभव मला आले आहे त्या अनुभवातून आपणास सांगतो कि आपल्या सर्व समाज वाधवांना एकत्रीत येऊन फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळ टिकवून ठेवावी लागणार आहे व संविधानाचे रक्षण करावे लागणार आहे, प्रत्येक पक्ष,संघटना ह्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालतात परंतु आपण बघतो की प्रत्येक पक्षांमध्ये संघटने मध्ये समाज बांधलेला आपणास दिसतो आहे प्रत्येक जन आपला नेता खूप मोठा दर्शवीव्यात व्यस्त आहे परंतु या पलीकडेही कोणावर अन्याय झाला त्या ठीकाणी सुद्धा यांचा मोठेपणा जागा होतो व एकमेकाच्या चढाओढीमध्ये समाजाला न्याय मिळत नाही आपला मोठेपणा मिरवण्यासाठी समाजाची दिशाभूल करणारे कार्यकर्ते खुप वाढू लागले आहे कोनीही समाजाच्या प्रश्नावर बोलत नाही राजकारण करू नये अशी माझी व्यथा नाही राजकारण करावे परंतु समाजाला धरून असावे न्याय हककांसाठी असावे गावातील जनतेच्या हितासाठी असावे खेडोपाड्यातील वाड्या वस्ती मधील समाजा पर्यत हित साधता येईल यासाठी असणे गरजेचे आहे पंरतु आज आपण बघतो पक्ष, संघटना, याच्या ना त्याच्या दावनीला बांणधलेल्या आहेत आपल्या समाजातील गावातील पुढारी समाजाच्या विरोधी पार्टीच्या दावणीला बांधलेले आपणास जास्त दिसुन येतील, कोणीही समाजाचा नगरसेवक असावा, किंवा सरपंच, सदस्य सभापती, आमदार, खारदार असावे यासाठी आवाज उचलत नाही, गावातील पुढारी तर थोड्या तूटपुंज्या रक्कमेसाठी, दारूच्या बाटलीसाठी, समाजाला एकत्रीत विचारात न घेता गावातील प्रतीष्ठीत पुढाऱ्याच्या मागे फिरत आहेत. आपल्या झेंड्याचा वापर सर्रास पणे होत आहे या मध्ये समाजाचे भविष्य काय ? यामुळे कार्यकर्ते लाचार झाले आणी समाज विखुरला जातो हे आपणास समजले पाहीजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या समाजाचे सर्वात जास्त गाव पुढारी व कार्यकर्ते 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीच्या वेळेस एकत्रीत येतात त्यातही कारण काय कि आता जयंती साजरी करायची मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंतीच्या नावावर वर्गनी गोळा करायची असते त्यामध्ये तर या गाव पुढाऱ्यांचा हात कोणी धरायचा नाही यांची सुरवात वर्गनीच्या पैशावर घरच्याना कपडे घेणे, रोज पार्टी करणे, मज्जा मारणे,व जाणीवपूर्वक गावामध्ये समाजाच्या नावावर पुढारी बनुन फिरणे त्यातच गावात एक नविन पुढारी तयार होतो तोही समाजाची दिशाभूल करून समाजामध्ये दुशीत वातावरण निर्मान करतो आशा भरपुर काही गोष्टी समाजामध्ये घडतात.या सर्व घडणार्या बाबी समाजाने बघीतल्या पाहीजे यावर आवाज उचलला पाहीजे मी आपल्या मधील एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी आहे मी हे अनुभवले आहे आणी यावर आवाज सुद्धा उचलला आहे मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी वर्गणी मागणाऱ्यांवर खंडनी सारखे गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे, तसेच वर्गणी देणारे अधिकारी यांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी करणार आहे, जेणे करूण समाजाने स्वखर्चाने जयंती साजरी केली पाहीजे, समाजाच्या प्रश्नावर आवाज उचलला पाहीजे आज आपल्या समाजाला एकत्रीत येण्याची खूप गरज आहे, आपण आजही आपण एकत्रित येतो परंतु 14 एप्रिल, सहा डिसेंबर, एक जानेवारी’ या दिवशीच आपण एकत्रीत दिसतो इतर वेळेस आपण समाज्याच्या कोणत्याही प्रश्नावर एकत्रीत येत नाही, इत्तर वेळेस आपण पक्ष, संघटना राजकारण यामध्ये विखुरले जातो, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहीजे आपल्या सर्व समाजाला विखरण्याचे काम जर कोण करत असेल तर ते दुसरे कोणी नसुन आपल्यातलेच काही शंड झालेले पुढारी आहे आणी पहीले आपण यांना ओळखले पाहीजे

राजकारणाच्या सत्ताधाऱ्यांच्या पुढे जाऊन समाजाचे हीत साधनारे पुढारी आज समाजा मध्ये पाहीजे, पक्ष. संघटना, या पलीकडेही समाजाचे काम केले पाहीजे ही भुमीका आपल्यात असायला हवी की विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाची वाटचाल हि प्रगतीकडे असावी यासाठी खुप मोठा त्याग केलेला आहे त्यांच्या त्यागाची एकवेळ तरी समाजाने सतत आठवण ठेवावी मी इतर लोकांसाठी नाही बोलत कारण ते खातात बापाच आणी गुण गातात दुसरयाचे अशा निर्लज्य लोकांनीं आपल्या बापाला सुध्दा वाटण्याचे काम केले आहे, परंतु ज्याच्या अंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे रक्त आहे अशा माझ्या सर्व समाज बांधवांनी एकत्रीत समाज्याच्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे आपण सर्वानी समाज्याच्या प्रत्येक प्रश्नावर आवाज उचलला पाहिजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सवलतीचा समाज्याच्या प्रगतीसाठी वापर करा प्रत्येक गाव पुढाऱ्याने जिल्हा खादी ग्राम उद्योग, समाज कल्याण विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर योजना, दलीत निधी या समाजापर्यंत पोहवल्या पाहीजेत यासाठी एकत्रीत लढा देऊन व समाजाप्रती एकनीष्ठ रहावे अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे,

 

मी शशिकांत दारोळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी म्हणून समाजासाठी आवाज उचलला आहे कि महार वतन

Please join the ongoing hunger strike at Azad Maidan, Mumbai, to raise your voice and demand the restoration of our rightful land to the rightful owners, the farmers of Mahar Watan. Let us unite and stand together to fight the injustice and ensure a better future for our society and future generations.

Mahar Watan; जमिनी महार वतनदारांना वतनदारांच्या वारसांना परत करा रिस्टोर करा. आपणास विनंती पुर्वक सांगतो की, आपल्या पुर्वजानंच्या कष्टाचा मोबदला म्हणून महार वतन जमिनी मिळालेल्या आहे त्यांनी या जमिनीसाठी खूप कष्ट केलेले आहेत परंतु आज त्या कष्टाचे फळ जाणीवपूर्वक सरकार पैशाने पुन्हा ‘सरकार लुटू पाहत आहे आज गावातील धनधांडग्या लोकांनी प्रतिष्ठित समाजाने राजकारणी नॉन बॅकवर्ड जमातीच्या लोकांनी महार वतनाच्या जमिनी कवडीमोल भावात धाकधपटशा दाखवुन अन्यायाने हिसकावून घेतल्या आहेत, आपणास पाणी पिण्यासाठी सुध्दा बाट असलेल्या गावामध्ये आपल्या महार वतन जमिनी होत्या त्या वेळेस आपल्या जमिनी महार वतन म्हणून दिलेल्या होत्या पावसाच्या पाण्यावर जमिन कसणे शक्य नसल्याने आपल्या जमिनी गावातील उच्चवर्णीय समाजाकडे कसण्यासाठी देऊन आपला उदर निर्वाह करणे ह्या हेतूने दिलेल्या महार वतन जमिनीवर जानीवपुर्वक हुकुमशाही असलेल्या सरकारणे कुळ लावले आहे व कुळाच्या नावे महार वतन जमिनी करून देण्याचे काम सरकारणे केले आहे, तसेच महार वतन जमिन महार समाज सोडुन कोणाही नॉन बैकवर्ड समाजाला खरेदी घेण्याचा अधीकार नसताना, सुध्दा जाणीवपूर्वक अनधिकृत पणे खरेदी विक्रीचे व्यवहार केले जात आहेत, तसेच काही जमिनी तर गावातील बलाड्य असणार्या गावातील राजकारणी सावकारांनी लाटलेल्या आहेत, अशा मुजोरीखोर सरकार व राजकारणी सरकार विरोधात आवाज उचलला आहे यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय नाशीक येथे दिनांक: 29/11/2023 रोजी आमरण उपोषण करण्यासाठी सुरवात करण्यात आली होती दोन दिवसाच्या आमरण उपोषण नंतर आपले उपोषण सोडविण्यासाठी प्रशासनाने पत्र सादर केले परंतु कोणतीही मोहीम प्रशासनाने राबविली नाही. नंतर आपण महार वतन जमिनी संदर्भात पुढील उचीत कारवाई साठी मुख्यमंत्री, महसुल मंत्री यांना सुद्धा तक्रार दाखल केली परंतु कोणतीही कारवाई न केल्यामुळे आजाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला परंतु या सरकार ने दखल घेतली नाही,व आमरण उपोषन करण्यास भाग पाडले त्या अनुसंघाने 20/01/ 2024 रोजी पासुन आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषन सुरु केले आहे आज दहा दिवस उलटुन सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही व झोपेचे सोंग घेतलेले आहे त्यामुळे आपल्या सर्व समाज बांधवांना मी कळवीतो की, आपण सर्वांनी एकत्रीत या आपल्या जमिनी पुन्हा मिळाल्या पाहीजे यासाठी आमरण उपोषणामध्ये सामील व्हा जेणे करून आपला समाज उपजिवीकेच्या साधना पासुन वंचित रहाणार नाही तसेच आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी एकत्रित घेऊन आवाज उचला व सरकारने आपल्याला फुकट धान्य खाण्याची सवय लावून समाजाची फसवणूक करण्याचे षडयंत्र लावले आहे त्यावर लाथ मारून आपण आपल्या जमिनी कसुन धान्य खाऊ शकतो यासाठी आपल्या हक्काच्या महार वतन जमिनी वतनदारांना वतनदारांच्या वारसांना परत करा रिस्टोर करा या मागणीसाठी एकत्रीत येऊया तसेच आपल्या समाजातील सर्व बांधवांना कळवितो ज्यांच्या जमिनी बळकावल्या असतील तसेच अनधिकृतपणे कोणी खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत, कोणाच्या जमिनी वर कुळ लावले असेल अशा सर्व समाज बांधवांनी संपर्क साधावा व आपल्या सर्व समाज बांधवांना आव्हान करतो की, आपण सर्वानी सुरू असलेल्या आझाद मैदान मुबई येथील उपोषणासाठी भेट देऊन जाहीर पाठींबा द्‌यावा.

आपला सर्वाचा बंधु शशिकांत दारोळे

मो. नं. 9359055213

“चल उठ जागा हो आपल्या वतनाचा धागा हो”

“जय भीम जय संविधान”

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!