Mahar Watan : महार वतनावर लागलेले कुळ प्रकरणाची चौकशीचे विभागीय आयुक्त डॉ.प्रवीन गेडाम यांचे आदेश
आमरण उपोषणकर्ते शशिकांत दारोळे यांच्या उपोषणाला अखेर यश
नाशिक,दि.26:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) प्रणित महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी उपोषण कर्ते शशिकांत दारोळे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केले होती अखेर वर्षानुवर्ष कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या प्रशासनाला चारदिवसांच्या अन्नपाणी त्याग केल्यानंतर जाग आली आहे.
खांजापुर गट क्र २६ या क्षेत्राची घडलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मा.विभागीय आयुक्त डॉ.प्रवीन गेडाम साहेब यांनी स्वतः घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन पत्र जिल्हाधिकारी यांना काढले आहे. सुरू असलेले आमरण उपोषण सोडण्यासाठी विनंती करुन लेखी पत्र देऊन उपोषण यशस्वी रित्या स्तगित केले आहे.
आमरण उपोषण कर्ते शशिकांत दारोळे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे की, आज आमरण उपोषणाचा चौथा दिवस असुन महाराष्ट्र मध्ये महार वतन जमिनी हे बळकवण्याचे जे षडयंत्र प्रशासनाने चालू केलेले आहे त्यामध्ये प्रशासनाचा संगनमताने लाखो करोडो रुपयाच्या जमिनी बिल्डरांनी तसेच कारखानदारांनी लाटण्याचा प्रकार सुरु आहे या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे. महार वतन जमिनी महार वतनदारांना वतनदारांच्या वारसांना पुन्हा रिस्टोर करा या मागणी करिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा आमरण उपोषण केलेले आहे.
हा लढा कायमस्वरूपी सुरू राहणार जोपर्यंत आमच्या वडिलोपार्जित जमिनी आम्हाला परत मिळत नाहीत. आमच्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून आम्हाला मिळालेल्या महार वतन जमिनी इनाम जमिनी आहेत या पुन्हा मिळाल्याच पाहिजे याकरिता आम्ही प्राण जाई पर्यंत लढा देणार आहोत असे शशिकांत दारोळे यांनी सांगितले.
या आमरण उपोषणासाठी अनमोल सहकार्य व प्रोत्साहन करणारे रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस मा.प्रविणभाऊ जगधने, रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख मा.अशोकभाऊ गायकवाड, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.विनोदभाऊ भोसले, जळगाव जिल्हा अध्यक्ष मा.अनिलभाऊ महीराळे, उत्तर अहमदनगर महिला जिल्हा अध्यक्षा सौ.जयाताई डोळस यांचे मनःपूर्वक आभार उपोषणकर्ता तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी व्यक्त केले आहेत.