Mahar Watan : महार वतनावर लागलेले कुळ हटवून क्षेत्र मूळ मालकांना परत करण्यासाठी शशिकांत दारोळे यांचे आमरण उपोषण सुरू
नाशिक,दि.23:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) प्रणित महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी उपोषणकर्ते शशिकांत दारोळे यांची आमरण उपोषणास सुरुवात झालेली आहे.
आमरण उपोषण कर्ते शशिकांत दारोळे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करतांना सांगितले आहे की, आज महाराष्ट्र मध्ये महार वतन जमिनी हे बळकवण्याचे जे षडयंत्र प्रशासनाने चालू केलेले आहे त्यामध्ये प्रशासनाचा संगनमताने लाखो करोडो रुपयाच्या जमिनी बिल्डरांनी तसेच कारखानदारांनी लाटण्याचा प्रकार सुरु आहे या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे. महार वतन जमिनी महार वतनदारांना वतनदारांच्या वारसांना पुन्हा रिस्टोर करा या मागणी करिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा आमरण उपोषण शशिकांत दारोळे यांनी केलेले आहे.
हा लढा कायमस्वरूपी सुरू राहणार जोपर्यंत आमच्या वडिलोपार्जित जमिनी आम्हाला मिळत नाहीत आमच्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून आम्हाला मिळालेल्या महार वतन जमिनी इनाम जमिनी आहेत या पुन्हा मिळाल्याच पाहिजे याकरिता आम्ही प्राण जाई पर्यंत लढा देणार आहोत असे शशिकांत दारोळे यांनी सांगितले.
तसेच वरील विषयानुसार विनंती पूर्वक तक्रार अर्ज विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी तक्रार अर्ज सादर करून ता. संगमनेर जि. अहमदनगर मौजे खांजापूर येथील गट क्र. २६ हे क्षेत्र महार वतन इनाम जमीन आहे सदर जमिनीवर मूळ मालक म्हणून जुने महार नावाने व आज रोजी दारोळे नावाने नोंद घेतलेल्या आहेत. परंतु खांजापूर येथील धनदांडगे । नॉनबेकवर्ड । समाजातील सातपुते यांनी अनाधिकृत पणे धाक दडपशाही करून महार वतन जमीन बळकवण्याचा प्रकार केलेला आहे.
प्रमुख मागण्या
१] खांजापूर गट क्र २६ वरील लागलेले कुळ हे तात्काळ हटवून क्षेत्र मूळ मालकांना परत करा.
२] महार वतन जमिनीचे झालेले अनधिकृतपणे झालेले खरेदीचे व्यवहार त्वरित रद्द करण्यात करा.
३) महार वतन व इनाम जमिनीवर झालेले अनधिकृत अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे.
४] महार वतन इनाम जमीन पुन्हा महार वतन दारांना हस्तांतर करा, या मागणी करिता आमरण उपोषण दिनांक २२/०७/२०२४ रोजी सुरू करण्यात आले आहे.
उतार्यावर दारोळे या नावाने नोंदी आहेत परंतु आम्हाला जमिनी मध्ये जाण्यासाठी मज्जाव केलेला आहे सातपुते यांनी दादागिरी करून जमिनीवर ताबा केलेला होता आणि आहे परंतु या सर्व प्रकारास आपले प्रशासन जबाबदार आहे जाणीव पूर्वक दलित समाजाची फसवणूक करून कायद्याचा गैरवापर करून महार वतन इनाम जमिनीवर कुळ कायदा लागू होत नाही. परंतु जाणीव पूर्वक महार वतन जमिनी | नॉनवेकवर्ड) समाजाच्या नावे कुळ कायद्याव्या नावाखाली ताब्यात देऊन पदांचा गैर वापर केलेला आहे.
सदर महार वतन जमिनी व इनाम जमिनी या कुळ कायद्यातून एक्सक्युड करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे वगळण्यात आलेल्या आहेत महार वतन जमिनी प्रोटेक्टेड जमिनी आहेत तरीही आपण जाणीव पूर्वक दलित समाजाची फसवणूक करत आहात या प्रकारास आपले तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी व संबधित प्रशासकीय अधिकारी यांनी आपल्या पदाचा मनमानी गैर वापर केलेला आहे. हे आमच्या निदर्शनात आले आहे. जाणीव पूर्वक महार वतन जमिनी प्रशासानाच्या संगनमताने लाटण्याच्या जो प्रक्रार सुरु आहे तो त्वरित विवावा व महार वतन जमीन मौजे खानापूर गट क्र. २६ या क्षेत्राची झालेल्या विषयाची तात्काळ चौकशी करून संबधित आरोपींवर कारवाई करावी या सर्व विषयाकडे आपण गांभीर्य पूर्वक लक्ष द्यावे मेहरबान साहेब अश्या पद्धतीनी आमच्या मागास्वर्गीय समाजाची फसवणूक होत आहे, आपण तात्काळ चौकशी करावी व आम्हाला न्याय मिळून द्यावा हि आपणास नम्र विनंती असे सांगण्यात आले आहे. याकरीता आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने दिनांक – २२/७/२०२४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले असुन मागण्या पूर्ण होईल पर्यंत आमरण उपोषण असेच सुरूच राहणार असुन कालपासुन विविध पक्ष, संघटना यांचा मोठ्याप्रमाणात पाठिंबा देवुन आपल्या सोबत असल्याचे कळविण्यात येत आहे असे उपोषणकर्ते शशिकांत दारोळे यांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली आहे.