Mahar Watan Land : महार वतनावर लागलेले कुळ हटवून क्षेत्र मूळ मालकांना पुन्हा हस्तांतरित करण्यासाठी आमरण उपोषण
अहमदनगर, दि.14:- अहमदनगर जिल्ह्यातील मौजे. खांजापूर येथील गट क्र. २६ हे क्षेत्र महार वतन आहे. जमिनीवर मुळ मालक म्हणून जुने महार नावाने व आज रोजी दारोळे नावाने नोंद घेतलेल्या आहेत. परंतु खांजापूर येथील धनदांडगे (नॉनबेकवर्ड) समाजातील सातपुते यांनी अनधिकृतपणे धाक दडपशाही करून महार वतन जमीन बळकिवण्याचा प्रकार केलेला आहे.
या उताऱ्यावर दारोळे या नावाने नोंदी आहेत परंतु जमिनीमध्ये जाण्यासाठी दारोळे यांनाच मज्जाव केलेला आहे. सातपुते यांनी दादागिरी करून जमिनीवर ताबा केलेला आहे परंतु या सर्व प्रकारास प्रशासन जबाबदार आहे जाणीवपूर्वक दलित समाजाची फसवणूक करून कायद्याचा गैरवापर करून महार वतन जमिनीवर कुळ कायदा लागू होत नाही, परंतु जाणीवपूर्वक महार वतन जमीनी नॉनबेकवर्ड समाजाच्या नावे कुळ कायद्याच्या नावाखाली ताब्यात देऊन पदाचा गैरवापर केले असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. शशिकांत दारोळे यांनी केला आहे.
तर सदर महार वतन जमीनी व इनाम जमिनी ह्या कुळ कायद्यातून एक्सक्यूड करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे वगळण्यात आलेल्या आहेत, महार वतन जमिनी प्रोटेक्टेड जमिनी आहेत, तरीही जाणीव पूर्वक दलित समाजाची फसवणूक करत आहात या प्रकारास आपले स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी व संबधित प्रशासकीय अधिकारी यांनी आपल्या पदाचा मनमानी गैरवापर केलेला आहे हे स्पष्ट निदर्शनास येत आहे.
जाणीवपूर्वक महार वतन जमिनी प्रशासनाच्या संगनमताने लाटण्याचा जो प्रकार सुरु आहे तो त्वरित धांबवावा व महार वतन जमीन मौजे खांजापूर गट क्र. २६ या क्षेत्राची झालेल्या विषयाची तात्काळ चौकशी करून संबधित आरोपींवर कारवाई करावी या मागणी करीता व दलित, मागासवर्गीय समाजाच्य न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने दिनांक २२/०७/२०२४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आमरण उपोषणसाठी बसणार असल्या बाबतचे निवेदन मा. राज्यपाल महोदय, राजभवन मुंबई, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. महसूल मंत्री मंत्रालय मुंबई, मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई मा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांना देण्यात आलेले आहे.