ताज्या घडामोडीपुणेसामाजिक

Manoj Jarange Mumbai March; जरांगे पाटील यांची पदयात्रा उदया पिंपरी चिंचवड मध्ये, वाहतुकीत मोठे बदल

पिंपरी चिंचवड दि.२३ निर्भीड वर्तमान:- मा. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची मराठा आरक्षणसाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा (Manoj Jarange Mumbai March) निघालेली असून आज चंदननगर (खराडी बायपास) पुणे येथे मुक्काम करणार आहेत तर उद्या दिनांक २४/०१/२०२४ रोजी पदयात्रा हि पिंपरी चिंचवड हद्दीत येणार आहे. पदयात्रा हि राजीव गांधी ब्रिज जगताप डेअरी- डांगे चौक- बिर्ला हॉस्पीटल चाफेकर चौक अहिंसा चौक महाविर चौक खंडोबामाळ चीक – टिळक चौक – भक्ती शक्ती – पुना गेट- देहूरोड- तळेगाव मार्गे मुंबई बाजूकडे जाणार असल्याने दिनांक २४/०१/२०२४ रोजी सकाळी ६.०० वा. पासून पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत वाहतूकीमध्ये महत्वपूर्व बदल करण्यात आलेले आहेत.

Manoj Jarange Mumbai March
Manoj Jarange Mumbai March

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे राहण्यासाठी पुढीलप्रमाणे तात्पुरते स्वरुपात बदल करण्यात आलेले आहेत. नागरीकांनी याची नोंद घ्यावी.

सांगवी वाहतूक विभाग

१. आँध डी मार्ट कडून सर्व प्रकारच्या वहनांना सांगवी फाट्याकडे येण्यास प्रवेश बंदी करण्यात येत असून सदर मार्गावरील चाहने पोल चौक येथून डावीकडे नागराज रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

२. पिंपळे निलेख कडून येणारी सर्व प्रकारची वाहने हि रक्षक चौकाकडे न येता ती विशालनगर डीपी रोडने जगताप चौक – कस्पटे चौक मार्ग इच्छित स्थळी जातील.

3.जगताप डेअरी ब्रीज खालील चौकामध्ये कस्पटे चौकाकडुन येणारी सर्व प्रकारची वाहने हि डाव्या व उजव्या बाजुने आँध रावेत रोडला न येता ती सरळ ग्रेड सेपरेटरमधून शिवार चौक कोकणे चौकाकडुन इच्छित स्थळी जातील.

४. शिवार चौकाकडून येणारी वाहतुक हि उजव्या डाव्या बाजुने आँध रावेत रोडला न येता ती सरळ ग्रेड सेपरेटरमधून कस्पटे चौकातुन इच्छित स्थळी जातील.

५. तापकीर चौक, एमएम चौकाकडुन काळेवाडी फाटा ब्रीज कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने हि रहाटणी फाटा चौकातून रहाटणी गाय गोडांबे चौकाकडून इच्छित स्थळी जातील.

६. सांगवी गावातून सांगवी फाट्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहने हि शितोळे पंप जुनी सांगवी व वसंतदादा पुतळा चौक जुनी सांगवी दापोडी मार्गे इच्छितस्थळी जातील.

वाकड वाहतूक विभाग

७. ताथवडे गांव चौकाकडून डांगे चौकाकडे येणारी वाहने ताथवडे चौकामधून उजवीकडे वळून ताथवडे अंडरपास किंवा परत हॅगिंग ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.

८. काळाखडक येथून डांगे चौकाकडे जाणारी वाहने काळाखडक येथून यु टर्न घेवून भुमकर चौक मार्गे इच्छितस्थळी जातील

९. वाकड दत्तमंदिर रोडने डांगे चौकाकडे येणारी वाहने अण्णाभाऊ साठे चौकातून उजवीकडे किंवा डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील.

१०. छत्रपती चौक कस्पटे वस्ती येथून काळेवाडी फाट्याकडे येणारी वाहने छत्रपती चौक येथून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

११. बारणे कॉर्नर थेरगाव येथून थेरगांव फाट्याकडे येणारी वाहणे उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील किंवा यु टर्न घेवून तापकिर चौकाकडे जातील.

१२. थेरगाव कडून बिर्ला हॉस्पीटल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची वाहने राघवेंद्र महाराज मठ येथून इच्छित स्थळी जातील किंवा बारणे कॉर्नर थेरगाव मागें इच्छित स्थळी जातील.

१३. कावरानगर पालास वसाहतांकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनानी कावर करण्यात येत असून सदरची वाहने हि वाकड भाजीमंडई समोरील कॉर्नर येथून डायीकडे वाकड पोलीस स्टेशनकडील रस्त्याने दत्त मंदिर रोडने इच्छित स्थळी जातील.

चिंचवड वाहतूक विभाग

१४. दळवीनगर चौकाकडुन खंडोबामाळ व चिंचवड स्टेशन कडे जाणारा रोड सर्व वाहनासाठी बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने ही बिजलीनगर चौक मार्गाने इच्छीतस्थळी जातील.

१५. रिव्हर ट्युव चौकातुन डांगे चौक तसेच डांगे चौकाकडून महावीर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने चिंचवडे फार्म मार्गाने चाल्हेकरवाडी रायेत मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच भोसरी कडे जाणारी वाहने चिजलीनगर वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

१६. चिंचवडे नगर टी जंक्शनकडे रिव्हर ध्रुव कडुन जाणारी वाहने सरळ रायेत मार्गे इच्छित स्थळी जातील.

१७. लोकमान्य हॉस्पीटल चौक, चिंचवड समोरील रोडवरून महाथिर चौक चिंचवड कडे जाणरा रोड सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने ही लोकमान्य हॉस्पीटल चौकापासुन डावीकडे वळून दळवीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

१८. एस.के.एफ. चौक चिंचवड मार्गाने खंडोबा माळ चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने ही बिजलीनगर चौक मार्गाने इच्छित स्थळी जातील.

१९. लिंकरोड पिंपरी कडून येणारी वाहने हि चाफेकर चौकात न येता ती मोराया हॉस्पीटल चीक केशवनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

२०. महाविर चौक व शिवाजी चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने हि मोहनगर चौकमार्गे इच्छितस्थळी जातील,

२१. बिजलीनगर चौकाकडून त्रिवेणी हॉस्पीटल चौकाकडून रिव्हर व्हयुव चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहतूक हि रावेत मागें इच्छित स्थळी जातील.

२२. मुकाई चौकाकडून चिंचवडकडे येणारी वाहतूक त्रिवेणी हॉस्पीटल चाल्हेकरवाडी येथे डावीकडे वळून पुढे पार्श्वनाथ चौक, भेळ चौक मार्गे पुढे काचघर चौकातून डावीकडे वळून पुढे यु टर्न घेवून भक्ती शक्ती चौकातील भुयारी मार्गातुन अंकुश चौक, त्रिवेणीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

पिंपरी वाहतूक विभाग

२३. निरामय हॉस्पीटलकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जात ती डावे बाजुकडे वळून मोरवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.

२४. परशुराम चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदरची बाहतूक आर डी आगा – थरमॅक्स चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.

२५. के.एस.बी चौकाकडून महावीर चौक तसेच छत्रपती शिवाजी चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने बसवेश्वर चौक येथून डावीकडे वळून अॅटो क्लटर मार्गे इच्छित स्थळी जातील.

निगडी वाहतूक विभाग

२६. थरमॅक्स चीकाकडुन येणारी वाहतुक ही आर.डी.आगा मार्गाकडुन गरवारे कपंनी कंपाऊड पर्यंत येवुन तेथील टी जॅक्शन वरुन खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडुन परशुराम चौकाकडुन मोहननगर चिचंवड मार्गे इच्छित स्थळी जातील.

२७. दळवीनगर पुलाकडुन व आकुर्डी गावठाणातुन येणारी वाहतुक खंडोबामाळ चौकाकडे न येता गणेश व्हिजन मागें व आकुर्डी गावठाण मार्गे इच्छित स्थळी जातील.

२८. दुर्गा चौकाकडुन येणारी वाहतुक ही टिळक चौकाकडे न येता ती थरमॅक्स चौकाकडे किंवा यमुनानगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

२९. भेळ चौकाकडुन येणारी वाहतुक ही टिळक चौकाकडे न येता ती साचली हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील.

३०. अप्पुघर/रावेतकडुन येणारी वाहतुक व ट्रान्सपोर्टनगर मधुन येणारी वाहतुक ही भक्ती शक्ती ब्रिजवर न चढता ती भक्ती शक्ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने (अंडरपासमधून) अंकुश चौक, त्रिवेणीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!