PMC : पुणे महानगरपालिकेत आस्थापना विभागाची माहिती न मिळावी यासाठी मुख्य दरवाजा अचानक बंद
मनपा कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या जीवाला धोका
पुणे : पुणे महानगरपालिकेत आस्थापना विभागात काम करत असलेल्या रूम नं 240 रूम चा मुख्य दरवाजा अचानक बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे पुणे मनपा कर्मचायऱ्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
रूम नंबर 241 च्या मागच्या बाजूला नवीन इमारत चे लेडीज वाशरूम आहेत व समोरचा मुख्य दरवाजा बंद केल्यामुळे त्या रूम मध्ये सफोकेशन होत आहे. त्यामुळे तेथे काम करत असणाऱ्या पुणे मनपा कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. सदर दरवाजा बंद करण्यामागचे मा. उपायुक्त (सामान्य प्रशासन) यांचे काय प्रयोजन आहे? का मा. अधिक्षक यांच्या सांगण्यावरून सदर प्रकार चालू आहे.
समोरील वाशरूम मुळे दुर्गन्धी निर्माण होत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी तो दरवाजा चालू स्थितीत होता, परंतु अचानक तो दरवाजा बंद केला जात आहे की ज्यामुळे नागरिकांना आस्थापना विभागाची माहिती न मिळावी हा तर हेतू नसावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.
तरी ह्या प्रकरणाकडे मा. पुणे मनपा आयुक्त यांनी लक्ष घालून हा दरवाजा खुला करावा अशी कर्मचारीसह सामन्य नागरिकांकडून मागणी केली जात आहे.