PMC : पुण्यातील पावसाळी लाईनमध्ये आढळल्या ऑप्टिकल फायबरच्या केबल
पुणे, निर्भीड वर्तमान:- रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचारा होण्यासाठी पुणे महानगरपालिकेने टाकलेल्या पावसाळी लाईनमध्ये चक्क ऑप्टिकल फायबर केबल्स टाकण्यात आल्याचा प्रकार सिंहगड रस्त्यावर पू.ल देशपांडे उद्यान्या समोर आढळून आला आहे.
त्यामुळे पावसाळी लाईन खरोकरच स्वच्छ केल्या जातात का, केल्या जात असतील तर मग हा प्रकार कसा निदर्शनास आला नाही असे प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या प्रकरणी संबंदीतावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सिंहगड रस्त्यावरील पू.ल देशपांडे उद्यानासमोर शनिवारी पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. महापालिका प्रशासन याठिकाणी पाहणी करण्यासाठी पावसाळी वाहिन्याचे चेंबर उघडे केल्यानंतर पावसाळी लाईन बंद असलेले आढळले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिक पाहणी केली असता, पावसाळी लाईनमध्ये चक्क ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात असल्याचे समोर आले या केबलमुळे या ठिकाणी घाण साचली आणी वाहिन्या बंद झाल्याचे महापालिका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.
महापालिका केबल टाकण्यासाठी 10 हजार रुपये मीटरप्रमाणे पैसे आकारण्यात येतात. त्यामूळे पैसे वाचवण्यासाठी महापालिकेच्या पावसाळी वाहिन्याचा वापर करण्यात आला आहे. महापालिका प्रशासानाच्या लक्षात ही बाब आता आली आहे. गेली अनेक वर्ष अश्या प्रकारचा वापर सुरु असू शकतो. तर पुणे महापालिकाने या सर्व वाहिन्या काढण्याचा निर्णय घेतला आहे.