Poonam Pandey Death News: मॉडेल पूनम पांडेचं निधन झाल्याचं वृत्त, इन्स्टाग्राम पोस्टमुळे खळबळ
मुंबई निर्भीड वर्तमान:- लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेचं (Poonam Pandey) सर्वायकल कॅन्सर कॅन्सरने निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पूनमच्या निधानाने तिच्या चाहत्यान सोबत सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचं (Poonam Pandey Death) निधन झाल्याचं वृत्त मिळत आहे. पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याबाबतची पोस्ट करण्यात आलेली असून या पोस्टमध्ये म्हटलंय की, “आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली” पूनम पांडेला सर्वायकल कॅन्सर कॅन्सर (Cervical cancer) अर्थात गर्भाशयाचा कर्करोग होता असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पूनम पांडेचा जन्म: 11 मार्च 1991 मध्ये झाला होता ती एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री होती पूनम ही तिच्या बोल्ड शैलीसाठी ओळखली जात होती. 2011 मध्ये, पूनम किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली आणि त्यानंतर 2013 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनेकदा तिच्या कामुक सोशल मीडिया चित्रे आणि व्हिडिओंमुळे वादात सापडत असे. 2013 मध्ये, तिने नशा या चित्रपटाच्या नायिकेची भूमिका साकारली होती. तिने तिचे अर्धनग्न छायाचित्र सोशल मीडियावर प्रकाशित करण्यास सुरुवात केली तेव्हा पासून ती इंटरनेटवर व्हायरल झाली आणी तिच्या अर्धनग्न छायाचित्रांनी अनेक वादही निर्माण केले.