Pune : महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना
पुणे, निर्भीड वर्तमान :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त संचलनाची पाहणी केली. यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मतदान करण्याची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.