Pune Loksabha : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती
पुणे, निर्भीड वर्तमान:- जिल्ह्यातील ३४-पुणे लोकसभा Pune Loksabha मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली आहे.
निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून ज्योती नारायण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-३०५ असा आहे. श्री. ज्योती नारायण यांचा संपर्क क्रमांक ९८११७५५४३९ व ०२०-२९९९७४३१ असा असून त्यांचा ईमले आयडी policeobserver34pune@gmail.com असा आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी विवेक पाडवी यांचा संपर्क क्रमांक ९८२३६६००७४ असा आहे.
श्री.ज्योती नारायण हे सकाळी १०:३० ते ११:३० या वेळेत भेटतील, असे पुणे लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.