Pune Police : दरोडा टाकून वाहनांची तोडफोड करून दहशत करणा-या ५ दरोडेखारांना केले जेरबंद
पुणे, निर्भीड वर्तमान:- पिझ्झा ऑर्डर डिलेव्हरी करण्याकरीता जात असताना, व्हीएसआय मेन गेट, चारवाडा मांजरी या ठिकाणी डिलेव्हरी बाॅयला धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल फोन व रोख ६६० रूपये जबरदस्तीने काढून घेतले होते तर याच आरोपींनी दुसर्या एका व्यक्तीची मोटर सायकलची तोडफोड करून, मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेवून त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली होती, तसेच जोरजोराने ओरडत परिसरातील दुचाकी व चारचाकी वाहनांची कोयत्याने तोडफोड करून परिसरामध्ये दहशत पसरवून आरोपी तेथुन निघून गेलेले होते याबाबत Pune Police हडपसर पोलीस ठाणे येथे विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गंभीर गुन्हाची तात्काळ दखल घेत Pune Police वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष पांढरे यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांना तपासाचा आराखडा तयार केला. व त्यानुसार आरोपी आलेल्या व गेलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्यास सुरवात केली. आरोपी आलेल्या मार्गाचे सुमारे १०० हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही पडताळणी केली. त्यावरून हे आरोपी बाहेरून घटनास्थळापर्यंत आल्याचे निष्पन्न झाले होते तसेच आरोपी घटनास्थळापर्यंत आलेल्या सुमारे १२ किमी मार्गाचे तांत्रिक विश्लेषणही करण्यात आले.
Pune Police तपास पथक अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथकाने प्राप्त फुटेज व केलेले तांत्रिक माहीतीच्या आधाराने आरोपी हे सोमाटणे फाटा, मावळ, पुणे येथील असल्याची माहीती प्राप्त करून आरोपी १) प्रेम सुरेश पाथरकर, वय १९ वर्षे २) अमर उत्तम शिंदे, वय २३ वर्षे ३) राज नाथा भोते, वय २१ वर्षे ४) रोहित रामा खंडागळे, वय २१ ५) संतोष तय्यप्पा जाधव, वय २० वर्षे हे सर्व राहणार परंदवडी ता. मावळ जि. पुणे. येथील असुन हे सर्व आरोपी मिळून आले आहेत. या पाच जणांनी आपसात संगणमत करुन सदरचा गंभीर गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून त्यांनी गुन्हा करताना वापर केलेल्या दोन दुचाकी, गुन्ह्यातील फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली चार धारदार कोयते हे हस्तगत करण्यात आले आहेत.
आरोपींविरूध्द यापुर्वी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहे.
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील व मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. आर राजा यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अश्विनी राख हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती मंगल मोढवे श्री. उमेश गित्ते यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमोल जाधव, प्रदीप क्षिरसागर, राजेंद्र करंजकर, वियज ढाकणे यांनी केलेली आहे.