Pune Police; मोटार सायकल चोरी करणारा सराईत चोर चंदननगर पोलिसांच्या जाळ्यात
पुणे, निर्भीड वर्तमान:- बिल्डींगचे खाली लॉक लावुन पार्क केली असलेली, हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकल कोणीतरी चोरी केल्याची मोटार सायकल मालक यांनी तक्रार दिल्याने चंदननगर पोलीस स्टेशन (Pune Police) गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या गाडीचा (Pune Police) चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार तपास करीत असताना, पोलीस अंमलदार कोद्रे व जाधव यांना आपल्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी तुकाराम ईश्वर आव्हाळे हा चोरीची मोटार सायकल घेवुन शेल पेट्रोल पंप येथे थांबला आहे.
मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे पोलीस स्टाफने शिताफीने तुकाराम ईश्वर आव्हाळे, वय-२२ वर्षे,याला चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेतले व त्याचेकडे अधिक तपास करतांना त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याला अटक करून, त्याचे ताब्यात मिळुन आलेली दाखल गुन्हयतील एक स्प्लेंडर प्लस नंबर एमएच-२६/ओझेड- ०१५२ ही जप्त केली.
अटक मुदतीत तुकाराम आव्हाळे याला विश्वासात घेवुन तपास करतांना त्याने गेल्या ३-४ महिन्यांपासुन विश्रांतवाडी, चंदननगर व हडपसर परीसरातुन मोटार सायकली चोरी केल्या असल्याचे पोलीसांना सांगितले आव्हाळे याने सांगितल्या प्रमाणे त्याने चोरी केलेल्या गाड्या ज्या ठिकणी लपवुन ठेवल्या होत्या त्याठिकाणी पोलीसांना एकुण ०६ मोटार सायकली मिळून आल्या त्याचेकडुन एकुण २,३५,०००/- रूपये किंमतीच्या एकुण ०७ मोटार सायकली आत्ता पर्यंत जप्त करण्यात आलेल्या आहेत. अधिक तपास, तपासी अधिकारी पोउपनिरी. गोरक्ष घोडके (Pune Police) हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-०४, श्री. विजयकुमार मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे, श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पो. स्टे कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती. मनीषा पाटील, पो.उप. निरीक्षक, गोरक्ष घोडके, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पो. निरीक्षक, प्रशांत माने, पो.उप. निरीक्षक, अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, महेश नाणेकर, दिलावर सय्यद, विष्णु गोणे, श्रीकांत शेंडे, शिवाजी धांडे, संतोष लवटे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, नितीन कांबळे, गजानन पवार यांनी केली आहे.