क्राइमताज्या घडामोडीपुणे

Pune Police: रिक्षा व दुचाकी चोरी करणारा आरोपी केला जेरबंद

पुणे, निर्भीड वर्तमान:- बंडगार्डन पोलीस स्टेशन Pune Police येथे भा.द.वि.क 379 नुसार नोंद असलेल्या गुन्हाचा तपास करीत असताना CCTV फुटेज च्या आधारे तपास पथकातील अधिकारी/पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व ज्ञाना बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक यांनी आरोपी प्रवीण शांतिनाथ गंगावणे, वय 30 वर्षे याला शिताफीने ताब्यात घेतले आहे व त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करत असतांना आरोपीने 1) बंडगार्डन पो स्टे गुन्हे नोंद क्रमांक 52/2024 भा.द.वि 379 व 2) बंडगार्डन पो स्टे गुन्हे नोंद क्रमांक 367/2023 भा.द.वि 379 असे दोन गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई Pune Police अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील मॅडम, साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो.हवा सुधीर घोटकुले, पो.शि ज्ञाना बडे,शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!