ताज्या घडामोडीपुणे

PUNE RTO :लोकसभा निवडणूक मतदानानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

पुणे, निर्भीड वर्तमान:- जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर  लोकसभा मतदासंघाच्या मतदानाकरीता  सोमवार १३ मे रोजी शासकीय सुट्टी जाहीर केल्याने प्रादेशिक परिवहन मुख्यालय, दिवे ब्रेक टेस्ट ट्रॅक, ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयडीटीआर) नाशिक फाटा आणि आळंदी रस्ता येथील कामकाजात बदल करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळवले आहे.


या सर्व ठिकाणी वाहन अनुज्ञप्ती, योग्यता प्रमाणपत्र, नूतनीकरण, वाहन नोंदणी व इतर सर्व कामकाज आणि १३ मे रोजीची पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या वाहनधारक आणि उमेदवारांची वाहन तपासणी, चाचणी किंवा संबंधित कामकाज १४ ते १७ मे या कालावधीत होईल. या बदलाची वाहनधारकांनी, उमेदवारांनी नोंद घेवून बदल केलेल्या तारखेला नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहनही प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!