Sahyadri Hospitals : सह्याद्री हॉस्पिटल मध्ये होते लूट ? ४ हजारचे इंजेक्शन ८५०० हजारला
पुणे, निर्भीड वर्तमान:- Sahyadri Hospitals ; हॉस्पिटल क्षेत्रातील एक नावाजलेले नाव म्हणजेच सह्याद्री हॉस्पिटलचे आहे. परंतु याच सह्याद्री हॉस्पिटल मध्ये चुकीच्या पद्धतीने बिल चार्ज करून रुग्णांची लूट होत आहे. असा आरोप करणारा विडिओ सोशल मीडिया मध्ये मोठया प्रमाणावर व्हाईरल होत आहे.
या मध्ये सांगण्यात आले आहे की, संगमनेर जवळील कवठे कमळेश्वर गावातील एक रुग्ण आहे. त्यांना निमोनिया झाला आहे व त्याचा उपचार घेण्यासाठी ते सह्याद्री हॉस्पिटल Sahyadri Hospitals येथे गेल्या ८ दिवसांपासून एडमिट आहेत त्यांच्या नातेवाईकानी हॉस्पिटल वर गंभीर आरोप करत ठिय्या आंदोलनच सुरू केल्याचे विडिओ मध्ये दिसत आहे.
काय आरोप करण्यात आले आहेत:
निमोनिया होऊन सात ते आठ दिवस झालेले आहेत,परंतु अॅडमिट करून उपचार सुरू असूनही कोणताही प्रकारची रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. पण बिल झाले ६ लाख रुपये
ICU मध्ये रुग्णाला सात दिवस ठेवण्यात आले १२ हजार रुपये प्रत्येक दिवसाला, विनटिलेर लावले नाही तरी ६०,०००/-, प्रोफेशनल चार्ज २६०००/-, प्रोडुसर चर्च ४३०००/-, लॅब्रोटरी चार्ज ३८००० एडमनेसेटीव ४२०००/- असे चार्ज लावण्यात आले आहे.
जे इंजेक्शन बाहेर ४००० रु मिळते ते हॉस्पिटल ८५००/- हजार रुपये चार्ज करतात.
दुसरे एक रुग्ण आहे त्यांचे १२ दिवसांचे ६५००००/- लाख रुपये बिल देण्यात आले आहे.
हि सर्व लूट मार चालू आहे, रेट चार्ज नाही आम्ही विचारणा करतो तर कोनीही बोलत नाही माहिती देत नाही, रीतसर जे बिल आहे ते चार्ज करावे रुग्ण बिल भरू शकतात. तर रक्षक दादागिरीची भाषा करतात.
असे विविध आरोप करण्यात आले आहेत आम्ही रीतसर विचारणा करत आहोत जो पर्यंत जबाबदार डॉक्टर बोलणे करत नाही तो पर्यंत जागेवरुण आम्ही उठणार नसल्याचे म्हंटल्या गेले आहे.