SC : अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन
पुणे, निर्भीड वर्तमान :- सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभागाअंतर्गत नव्याने सुरू झालेल्या दौंड येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते ८ वी इयत्तेची प्रवेश प्रक्रिया सूरू झाली असून अनुसूचित जातीसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रर्वग २ टक्के आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा आरक्षित आहेत.
प्रवेशासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, विद्यार्थी नोंद पत्रिका, विद्यार्थ्यांचे व पालकांची चार रंगीत छायाचित्रे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
शाळेत डिजिटल अध्यापन सुविधा, सायन्स पार्क, सेमी इंग्रजी माध्यम, मोफत भोजन व निवासाची सोय, स्वच्छ वातावरण व सुसज्ज इमारत, विविध खेळ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वतंत्र भव्य क्रीडांगण, स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय, ई ग्रंथालय आदी सोयी सुविधा असून दरवर्षी स्नेहसंमेलन, क्रीडा मेळावा व सहलीचे आयोजन करण्यात येते.
अधिक माहितीसाठी मुख्याद्यापक मुलांची निवासी शाळा, दौंड, भ्रमणध्वनी क्रमांक ९७६२९६९९५५ वर इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहनही शाळेचे मुख्याद्यापक एम. एम. वाघमारे यांनी केले आहे.