सातारा दि. 8: सातारा जिल्हयातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील व जे सतत मागील 3 वर्षा पासून ऊसतोड कामगार म्हणून काम करत आहेत. त्यांना साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व गट विकास अधिकारी यांच्या समन्वयाने सर्व्हे करून ग्रामसेवक यांच्यामार्फत ओळखपत्र देण्यात येत आहेत तरी ऊस तोड कामगारांनी जेथे वास्तव्यास असलेल्या ग्रामसेकाशी संपर्क साधून ओळखपत्र काढून घ्यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
ऊसतोड कामगारांना ओळखपत्र दिल्यानंतर पुढीलप्रमाणे लाभ देण्यात येत आहेत.
ऊसतोड कामगार यांना एक देश एक रेशनकार्ड या योजनेची अंमलबजावणी करणे, ऊसतोड कामगारांकरीता हेल्थ कॅम्प राबविणे. ऊसतोड कामगार यांना पाणी पुरवठा / स्वच्छता यांची सोय करणे. ऊसतोड कामगारांच्या मुलांना साखर शाळा सुरू करणे. ऊसतोड कामगारांचे 0 ते 6 वयोगटातील बालकास सकस आहाराची / किंवा अंगणवाडी मध्ये प्रवेश देऊन शैक्षणिक लाभ देणेची अंमलबजावणी करणे. ऊसतोड महिला कामगारांसाठी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करणे. ऊसतोड कामगार यांचे मृत्युनंतर देण्यात येणारे उपदान असे लाभ देता येणार आहेत.