Ustad Rashid Khan: दिग्गज संगीतकार उस्ताद राशीद खान यांचे निधन,कर्करोगाशी सुरू असलेला लढा अखेर संपला
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "हे संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण संगीत समुदायाचे मोठे नुकसान आहे.अजूनही विश्वास बसत नाही आहे की राशिद खान आता नाही
पुणे, दि. ९ निर्भीड वर्तमान:- आओगे जब तुम ओ साजना, नैना फुल खिलेंगे चे लोकप्रिय गायक राशिद खान (Rashid Khan) यांचे निधन झाले आहे. जब वी मेट, माय नेम इज खान, मौसम, हेट स्टोरी अशा चित्रपटांमध्येही आपल्या आवाजाची किमयामुळे सर्व गाणे लोकांच्या मनात कायमची घर करून ठेवली आहे त्यामुळेच त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे परंतु त्यांच्या निधनाने कला विश्वातच नाही तर राशिद खान (Rashid Khan) यांच्या च्याहत्या वर्गामध्ये शोककळा पसरली आहे.
प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्यानंतर खान यांनी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय मदत घेतली होती. नंतर त्यांनी कोलकाता येथे विशेष उपचार घेणे पसंत केले. खान यांनी सुरुवातीला उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु, 23 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांना ऑक्सिजन सपोर्टसाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणी 9 जानेवारी 2024 रोजी वयाच्या 55 व्या वर्षी राशिद खान यांनी अखेर शेवटचा श्वास घेतला.
राशिद खान यांच्या निधनाबद्दल बोलताना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “हे संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण संगीत समुदायाचे मोठे नुकसान आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की राशिद खान आता नाही.”
राशिद खान हे भारतीय शास्त्रीय संगीतकार होते. ते रामपूर-सहस्वान घराण्याचे होते आणि घराण्याचे संस्थापक इनायत हुसेन खान यांचे पणतू होते. राशिद खानने वयाच्या अकराव्या वर्षी त्यांची पहिली मैफल दिली आणि पुढील वर्षी, 1978 मध्ये, त्यांनी दिल्लीतील ITC कॉन्सर्टमध्ये सादरीकरण केले. एप्रिल 1980 मध्ये, जेव्हा निसार हुसेन खान आयटीसी संगीत संशोधन अकादमी (एसआरए), कलकत्ता येथे गेले , तेव्हा रशीद खान देखील वयाच्या 14 व्या वर्षी अकादमीमध्ये सामील झाले. 1994 पर्यंत, त्यांना संगीतकार (औपचारिक प्रक्रिया) म्हणून मान्यता मिळाली.
त्यांना २००६ मध्ये पद्मश्री, तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना २०२२ मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील पद्मभूषण, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारही प्रदान केला होता.