पुणे महानगरपालिका तर्फे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने मागविले अर्ज..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना या योजनांतर्गत युवक, युवती, महिला, पुरुषांकडून खालील योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
योजनेचे नाव तपशील.
१. इ. १० वीतील विद्याथ्र्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
इ. ९ वीमध्ये ५०% वा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले असल्यास व वाल्मीकी समाजातील ४५% वा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना इ. १० वीमध्ये प्रवेश घेतला असल्यास खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य देणेत येते.
२. इ. १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
सन २०२३ २०२४ या शैक्षणिक वर्षांत इ. १२ वीत प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांना (इ. ११ वीत ६०% वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक) खाजगी क्लासकरिता अर्थसहाय्य देणेत येते. फक्त कॉमर्स व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत.
३. सी.ई.टी. परिक्षेस बसण्यासाठी सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षात इ. १२ वीत प्रवेश घेतलेल्या अर्थसहाय्य
विद्यार्थ्यांना सी.ई.टी. परिक्षेकरिता प्रवेश शुल्कासाठी अर्थसहाय्य देणेत येते. इ. ११ वीत ६०% वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक.
४. उच्च व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य
वैद्यकीय, इंजिनिअरिंग, व्यवस्थापन, संगणकीय इ. शाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमास शासनमान्य शिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांना (मागील वर्षी ६० टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे (आवश्यक) शैक्षणिक अर्थसहाय्य देणेत येते.
वरील सर्व योजनांचे अर्ज दि. १० जुलै २०२३ ते दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती भरण्यात यावेत.
तसेच याबाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती बघण्यात मिळतील. तर अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.