वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- शनिवार दि. ७ जानेवारी २०२३ रोजी G20 परिषदेच्या निमित्ताने मा. आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या वतीने भव्य सायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये G20 व इतर पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. १५०० हून अधिक सायकल प्रेमी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
पुणे महानगरपालिकेतील अतिरिक्त महापालिका आयुक्त मा. रवींद्र बिनवडे , मा. कुणाल खेमनार, मा विकास ढाकणे व क्रीडा उप आयुक्त संतोष वारूळे हे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
या रॅलीचा मार्ग मनपा भवन, मॉडर्न कॅफे चौक, जंगले महाराज रस्ता, अलका टॉकीज, टिळक रोड, अभिनव कॉलेजचौक, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा, पुन्हा पुणे महानगरपालिका असा होता. यामध्ये तीनही अतिरिक्त महापालिका आयुक्त व इतर महानगरपालिकेतील अधिकारी यांनी रॅलीत सहभाग घेतला. यानंतर सर्वांना मेडल देण्यात आले. या रॅलीचे संपूर्ण आयोजन क्रीडा विभाग व भांडार विभाग यांचे समन्वयाने करण्यात आले. याकरिता श्री सुरेश परदेशी, मुख्य समन्वयक पुणे महानगरपालिका सायकल क्लब तसेच श्री प्रशांत गवळी, महेश कारंडे, विशाल भोसले, विशाल पाटील, विजय इंगळे, पुनम दर्डिगे आणि एस आर नेहा भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले.