व्यापारी मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात, बनावट सही, शिक्का मारून केली 25 लाखांची फसवणुक
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- वारजे येथील बिर्ला स्टिल कॉर्नरचे मालक माणिक बिर्ला यांची कोथरूड येथील त्यांचेच व्यापारी मित्र राजलक्ष्मी स्टिल दुकानाचे मालक मुकेश अग्रवाल यांनी 25 लाख रुपयांची बनावट सही शिक्का वापरून फसवणुक केल्या प्रकरणी डेक्कन पोलीस स्थानक येथे बिर्ला यांनी तक्रार दाखल केली आहे.
सविस्तरः माणिक बिर्ला यांचे व्यापारातील एकेकाळचे मित्र मुकेश अग्रवाल यांचेही भुसारी कॉलनी, कोथरुड येथे ‘राजलक्ष्मी स्टिल’ या नावाने बिल्डींग मटेरियल पुरवठा करण्याचे दुकान आहे. या दोघांचाही बिल्डींग मटेरियल पुरवठा करण्याचा व्यवसाय असल्याने व्यवसायातुन बिर्ला व मुकेश अग्रवाल यांची ओळख झाली व तेव्हापासुनच दोघांचेही मैत्रीपुर्ण संबंध होते. दोघांमध्ये संबंध असल्याने एकमेकांना व्यवसायाकरीता मालाची तसेच आर्थीक मदत करत असत. मुकेश अग्रवाल यांनी व्यवसायाकरीता बिर्ला यांच्याकडून वेळोवेळी चेकद्वारे त्यांची पत्नी मोना मुकेश अग्रवाल यांचे खात्यावर एकुण 55 लाख रुपये घेतले होते. त्यांनी घेतलेल्या 55 रुपयांपैकी 30 लाख रुपये त्यांनी बिर्ला यांना चेकद्वारे परतही केले होते.
परंतू बिर्ला हे आपण दिलेल्या पैशापैकी उर्वरीत 25 लाख रुपयांची मुकेश अग्रवाल यांचेकडे वारंवार मागणी करत होते परंतु वेळोवेळी वेगवेगळे वायदे करुन पैसे देण्यास टाळाटाळ अग्रवाल यांनी केली.
त्यानंतर सन 2015-16 मध्ये मुकेश अग्रवाल यांनी आयटीआर रिटर्न भरण्याकरीता त्यांनी आणलेल्या व्हाऊचर्वर बिर्ला स्टिल कॉर्नर या फर्मचे शिक्के व बिर्ला यांच्याकडून सह्मा मागितल्या त्यावेळी बिर्ला यांनी त्यास दिलेले 25 लाख रुपये पहिले परत करा त्यानंतर मी आयटीआर साठी तुम्हाला व्हाऊचरवर सही शिक्का देतो असे सांगितले.
त्यावेळी मुकेश अग्रवाल यांनी बिर्ला यांना तुमचे पैसे तुम्हाला दिले आहेत असे सांगितले. त्यांचे वैयक्तीक लेजर स्टेटमेंटची प्रत (प्रत संलग्न) बिर्ला यांना दिली व त्याप्रमाणे पैसे दिले आहेत असे सांगितले. या लेजर स्टेटमेंटमध्ये कॉसमॉस बँकेमधुन एकुण सात चेक बिर्ला स्टिल कॉर्नर या फर्मचे नावे चेकद्वारे बिर्ला यांना पैसे दिल्याचे दाखविले.
माणिक बिर्ला यांचा व्यवसाय मोठा असल्याने बिर्ला यांच्या बँक खात्यावर मोठया प्रमाणात पैशाची आवक जावक होत असल्याने मुकेश अग्रवाल यांनी त्यांचे वैयक्तीक लेजर स्टेटमेंट मध्ये दर्शविल्याप्रमाणे दिलेल्या पैशांच्या रकमेच्या नोंदी लक्षात आल्या नसतील असे समजुन बिर्ला यांनी त्यावेळी मुकेश अग्रवाल यांना अकाऊंटंट कडुन खातेउता-याची पाहणी करुन 25 लाख रुपये खात्यावर जमा झाले अगर कसे याची खातरजमा करुन पैसे जमा झाले असल्यास आयटीआर साठी व्हाऊचरवर सही शिक्का देतो असे सांगितले.
बँक खात्याचा उतारा काढुन पाहिला असता त्यामध्ये मोना अग्रवाल अगर मुकेश अग्रवाल यांचे खात्यावरुन बिर्ला यांच्या खात्यावर चेकद्वारे उर्वरीत 25 लाखापैकी कोणतीही रक्कम न आल्याचे निदर्शनास आले.
बिर्ला हे पुन्हा मुकेश अग्रवाल यांचेकडे पैशांची मागणी केली असता त्यावेळीही मुकेश अग्रवाल यांनी वरील चेकद्वारे पैसे दिल्याचे सांगुन आता तुमचे माझ्याकडे काहीही देणे शिल्लक नाही असे सांगुन पैसे देण्यास नकार दिला.
त्यामुळे बिर्ला हे प्रथम कॉसमॉस बँक येथे व नंतर जनलक्ष्मी बैंक येथे जावुन वर नमुद I.I.F. I (एकीकृत चेकबाबत विचारपुस करता दोन्हीही बँकांमधुन बेरर चेकद्वारे 25 लाख रुपये काढल्याचे समजले. अधिक चौकशी करता सदरचे चेक बिर्ला स्टिल कॉर्नर फर्मच्या नावे काढले असल्याचे बँकेतून समजले. सदरवेळी बिर्ला यांनी बँकेमध्ये सांगितले की, मी स्वतः बिर्ला स्टिल कॉर्नर फर्मचा मालक असुन सदरचे पैसे घेण्याकरीता मी आलोच नव्हतो तर माझ्या नावे कोणी पैसे काढले याबाबत खातरजमा करण्याकरीता सदरचे चेक दाखविण्याची विनंती केली असता काही दिवसांनतर कॉसमॉस बँकेमध्ये सदरचे चेक दाखविले असता त्या चेकच्या पाठीमागील बाजुस बिर्ला स्टिल कॉर्नर फर्मच्या नावाचा बनावट शिक्का व बिर्ला यांची बनावट सही केली असल्याचे दिसले. तसेच सदर चेकपैकी एका चेकवर मुकेश अग्रवाल व दुस-या चेकवर राज अग्रवाल यांचे पॅनकार्ड व ड्रायव्हींग लायसन्सचे क्रमांक लिहीले असल्याचे व त्यावर त्या दोघांनी सही केली असल्याचे निदर्शनास आले. तसेच जनलक्ष्मी बँकेत जावुन अधिक चौकशी करता तेथील चेकच्या पाठीमागील बाजुस देखील बिर्ला स्टिल कॉर्नर फर्मच्या नावाचा बनावट शिक्का व बिर्ला यांची बनावट सही केली असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे मुकेश फुलचंद अग्रवाल यांनी विश्वास संपादन करुन व्यवसायाकरीता दि. 26/02/2013 ते दि. 23/03/2013 रोजीपर्यंत वेळोवेळी त्यांची पत्नी नामे मोना मुकेश अग्रवाल यांचे खात्यावर 55 लाख रुपये घेतले व ते पैसे परत करताना मोना मुकेश अग्रवाल, मुकेश फुलचंद अग्रवाल, राज मुकेश अग्रवाल यांनी संगनमत करुन बिर्ला यांचे घेतलेल्या 55 लाख रुपयांपैकी 30 लाख रुपये क्रॉस चेकद्वारे परत करुन फसवणुकीच्या इरादयानेच उर्वरीत 25 लाख रुपयांचे बिर्ला स्टिल कॉर्नर फर्मच्या नावाने बेरर चेक तयार करुन ते बिर्ला यांने न देता त्यावर बनावट शिक्का उमटवुन व बिर्ला यांच्या बनावट सहा करुन दि. कॉसमॉस को-ऑप बँक लि. शाखा गोखलेनगर, शिवाजीनगर पुणे व जनलक्ष्मी को-ऑप. बँक लि. शाखा डेक्कन जिमखाना यांचे तत्कालीन बँक मॅनेजर व स्टाफ यांच्या सहकार्याने मुकेश अग्रवाल व त्यांचा मुलगा राज अग्रवाल यांनीच काढुन घेवुन बिर्ला यांची 25 लाख रुपयांची फसवणुक केली व ते पैसे स्वतःच्या आर्थीक फायदयाकरीता वापरुन अपहार केला आहे. म्हणुन 1) मोना मुकेश अग्रवाल 2) मुकेश फुलचंद अग्रवाल 3) राज मुकेश अग्रवाल 4) तत्कालीन बँक मॅनेजर व स्टाफ, दि कॉसमॉस को-ऑप बँक लि. शाखा गोखलेनगर, शिवाजीनगर पुणे तसेच 5)तत्कालिन बँक मॅनेजर व स्टाफ, जनलक्ष्मी को-ऑप. बँक लि. शाखा डेक्कन जिमखाना, यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असुन राज अग्रवाल यांना पोलीसांनी अटक केली आहे. यापुढील तपास गजानन चोरमले, सहा पोलीस निरीक्षक, डेक्कन पो.स्टे. हे करत आहेत.