सामाजिक सुरक्षा विभागने गुटखा व विदेशी दारू साठा करून विक्री करणा-यावर केली कारवाई..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दि.२८/०२/२०२३ रोजी घर नं. ९, वडारवाडी, चतुःश्रृंगी, पुणे येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु जन्य पदार्थ पान मसाला, गुटखा व विदेशी दारु साठा करून विक्री होत असलेबाबत गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी सामाजिक सुरक्षा विभागा गुन्हे शाखेचे अधिकारी यांना मिळाली.
मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागा गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठवुन ठेवलेला गुटखा २,१२,१०४/- रू. किचा व विदेशी दारू २७६५०/- रू किची तसेच ३२,४६०/- रूपये रोख रक्कम असा एकुण २,७२,२१४/- रू. किचा मुद्देमाल मिळुन आला असुन तो जप्त करून गुटखा व दारू विक्री करणा-या ०१ आरोपीस ताब्यात घेऊन त्याचेविरूध्द चतुःश्रृंगी पो स्टे गुरनं. १८६ / २०२३ भादवि कलम ३२८, १८८, २७२, २७३, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय ) अधिनियम कलम ७(२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम ५९ व महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा कलम ६५ ई अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, त्यास पुढील कारवाई करीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, इरफान पठाण, इम्रान नदाफ, संदीप कोळगे व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.