Atrocity: बौद्धांच्या जमिनीच्या गैर व्यवहाराबद्दल ॲट्रॉसिटी साठी आरपीआय सह भीमशक्तीची पोलीस स्टेशनला भेट
बदलापुर, निर्भीड वर्तमान:- गैरमार्गाने जमिनीचा व्यवहार करून बौद्ध समाजाच्या वारसदारांच्या जमिनीचा ताबा घेऊन जमीन नावावर हस्तांतर करणारे गैरअनुसूचित जातीचे गैरअर्जदार यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आरपीआय चे मिलिंद वानखेडे यांच्यासह पीडित भालेराव कुटुंबियांनी कुळगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली आहे.
आंबेशिव बुद्रुक तालुका अंबरनाथ येथील बौद्ध समाजाच्या सहा वारसदारांची 44 गुंठे जमीन होती यापैकी एकाच वारसदारा सोबत गैर अनुसूचित जातीच्या गैर अर्जदाराने व्यवहार करून गैर मार्गाने जमीन हस्तांतरित केली व तीच जमीन इतर गैर अनुसूचित जातीच्या गैर अर्जदाराला बेकायदेशीर विकली आहे. त्यामुळे दोन्ही गैर अर्जदारांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर कायद्यात बसेल तो गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिले आहे.
यावेळी भिमशक्ती क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोईर, कोषाध्यक्ष रतन जाधव, आरपीआय प्रदेश सचिव कुशल निकाळे, कार्यालयीन सचिव नितीन उघडे ,मिलिंद भवर, नितेश शिंदे, पीडित पूनम गायकवाड, शितल पवार ,सावित्री चंदने ,चंदा गायकवाड, सचिन भालेराव आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते