आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

(CDS) Exam : छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

पुणे, निर्भीड वर्तमान :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस (सीडीएस) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे १० जून ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६३ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी ४ जून २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या https://mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील सीडीएस ६3 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट पूर्ण भरून तीन प्रतीत सोबत घेऊन यावी लागणार आहेत.

तर कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस परीक्षेच्या पूर्व तयारी कोर्ससाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!