Crime : लोकांची फसवणुक करणारी टोळी खंडणी विरोधी पथकाकडुन जेरबंद
ठाणे, निर्भीड वर्तमान:- कमी किमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगुन फसवणूक केल्या प्रकरणी देवनार पोलीस स्टेशन येथे @crime गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी महालक्ष्मी मंदीरासमोर, साकेत रोड, राबोडी ठाणे पश्चिम याठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमी पोलीसांना @police मिळाली.
मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मालोजी विषदे यांचे मार्गदर्शनाखाली #police खंडणी विरोधी पथकातील सपोनि सुनिल तारमळे, पोहवा चिंपी, पोहवा भोसले, पोहवा गुरसाळी, पोहवा पावसकर, पोशि पाटील यांनी महालक्ष्मी मंदीराजवळ सापळा रचला व शिताफीने आरोपी 1) हसन मुसा षेख, वय 29 वर्ष 2) वहावली अमीर अली खान, वय 26 वर्ष 3) हैदर नयान शेख, वय 32 4) माजीद अली ताहीर हुसेन, वय 39 वर्ष, 5) फरजाना उर्फ काजली अमीरउल्ला शेख, वय 39 वर्ष यांना ताब्यात घेतले तसेच अधिकचा तपास केल्यानंतर त्यांनी @crime गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून गुन्हयांतील रोख रक्कम तसेच मोबाईल असा एकुण 1.86.200/- रू किमंतीचा माल हस्तगत करण्यांत आलेला आहे.
तसेच आरोपी यांचेकडुन 1) देवनार पोलीस स्टेशन, मुंबई गु.र.न. 564/2024 भादवि कलम 420. 34 2) मानपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर गु.र.न. 953/2023 भादवि कलम 420. 34 असे गुन्हे #crime उघडकीस करण्यात आले असुन त्यांनी नवी मुंबई, ठाणे व मुंबई परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.